कचरा खाणारी बास्केट

दिनांक: १६ ऑगस्ट, २०१५

कचरा खाणारी बास्केट

कचरा खाणारी बास्केट

‘स्वयंपाकघरातील ओला कचरा जिरविण्याची हि एक उपयुक्त पद्धत आहे. ४ ते ६ माणसांच्या कुटुंबाला हि ६ महिने चालते. त्यानंतर झालेले खत बागेला वापरता येते. बास्केट ला असलेल्या जाळीमुळे कचर्याला प्राणवायू मिळतो त्यामुळे त्याला वास येत नाही. ह्या पद्धतीत फक्त दोनच पथ्ये पाळावी लागतात. एक म्हणजे कचरा बारीक करून बास्केट मध्ये घालायचा व दुसरे म्हणजे त्यात पाणी होऊ द्यायचे नाही.’ असे श्री. अभिजीत गणपत्ये यांनी सांगितले. भारती निवास सोसायटीच्या कचरा विषयक कार्यक्रमात ते बोलत होते.

‘ पुणे म.न.पा. ची कचरा जिरवण्याची मोठी प्रोजेक्ट्स अयशस्वी होताना दिसत आहेत अशा वेळी नागरिकांनी घरोघरी आपला ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि ओला कचरा घरातच जिरवणे हे अत्यावश्यक असल्याचे ‘ नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनातला आपला खारीचा वाटा उचलून त्याच्या खतावरच नागरिकांना फुलबागही फुलवता येईल असे त्या म्हणाल्या. या वेळी भारती निवास सोसायटीचे श्री. जयंत आगाशे व श्री.माधव ढेकणे उपस्थित होते. सौ. अनुश्री गणपत्ये यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी प्रभाग ३६ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.