Theme Song

संकल्पना-गीत

नाचू खेळू गप्पा मारू
खूप गम्मत करू
गाणी गोष्टी नाटुकल्यानी
रंग मजेचे भरू

तऱ्हेतऱ्हेचे खेळू खेळ
कळे न केव्हा संपे वेळ
खेळासाठी सराव भारी
कसून आम्ही करू!

मित्र मिळाले इथे छान
त्यांच्या संगे हरपे भान
अभ्यासाच्या आधी थोडी
दंगा मस्ती करू!

आनंदाचे हसरे क्षण
चला लुटुया सारे जण
नाही कुठलेही बंधन
नाही कसलेही टेन्शन
मुक्तमोकळे होते मन
आम्हां आवडे बालरंजन!!

***************

संकल्पना:        माधुरी सहस्रबुद्धे

गीतलेखन:       डॉ. संगीता बर्वे

संगीत:             अनिश कुडेकर

ध्वनीमुद्रण:      महेश लिमये, मल्हार स्टुडीओ

गायिका:           प्रांजली बर्वे

सहगायक:        पूर्वा बाम, श्रुती ठाकूर, पार्थ देशपांडे, यश घोलप

***************