‘मॉडेल स्मार्ट सिटी’ ला भेट

दिनांक: २० नोव्हेंबर, २०१५

दिवाळीची सुट्टी संपता संपता, बालरंजन केंद्रातील मुलांनी ‘मॉडेल स्मार्ट सिटी’ ची सैर करण्याचा आनंद घेतला.

भारती निवास सोसायटीतील श्री.श्रीकांत बागुल यांनी आपल्या निवासस्थानी १० फुट x ५ फुट आकाराचे स्मार्ट सिटीचे टेबल-top मॉडेल बनविले आहे. यामध्ये विमानतळ, बोगद्यामधून धावणाऱ्या तीन रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानक, घरे, देऊळ, चर्च, कारखाना, उड्डाणपूल, स्कायwalk, पेट्रोल-पंप, पथ-दिव्यांसह असलेले गुळगुळीत रस्ते, त्यावरील विविध वाहने अशा रंजक गोष्टी आहेत.

मुलांनी खूप उत्सुकतेने हे प्रदर्शन पहिले व श्री.बागुल यांना अनेक प्रश्नही विचारले. बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 'मॉडेल स्मार्ट सिटी' ला भेट

बालरंजन-केंद्रातील-मुले-श्री.श्रीकांत-बागुल-यांनी-निर्मिलेले-स्मार्ट-सिटी-चे-मॉडेल-बघताना