टॉवेल factoryला भेट

दिनांक: २ डिसेंबर, २०१५

मुलांच्या लहानपणी विविध ठिकाणी दिलेल्या भेटींमुळे मुलांचे अनुभव विश्व समृद्ध होते.

भारती निवास सोसायटी च्या बालरंजन केंद्राची मुले नुकतीच सोलापूरला गेली होती. तेथील वास्तव्यात मुलांनी टर्किश टॉवेल बनविणाऱ्या factoryला भेट दिली. या भेटीचे आयोजन संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले होते. निर्मितीची प्रक्रिया पाहताना मुले हरखून गेली. ‘बालाजी विव्हिंग मिल्स’चे मालक श्री. गोविंद झंवर यांनी मुलांच्या प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरे देत त्यांचे शंका निरसन केले. आधुनिक मशीन्सवर भराभरा तयार होणारी, विविधरंगी कम्प्युटराईजड डिझाईन्स पाहताना मुलांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

मिलमध्ये सुत आल्यापासून त्याचे ‘ब्लिचिंग’, ‘कलरिंग’, ‘ड्रायिंग’ व त्यानंतर तयार होणारे सुतांचे cones मुलांना पाहायला मिळाले. त्यानंतर, कॉम्प्युटरवरील डिझाईन नुसार त्याची छतावर केलेली रचना त्यांनी पहिली. छतातून हजारो रंगीत दोरे वेगाने खाली मशीनमध्ये जाऊन, विणलेले टॉवेल बाहेर पडतानाचे दृश्य विलोभनीय होते. त्यानंतर मुलांनी शेजारील भव्य ‘stitching unit’ ला भेट दिली.

शंभर टक्के युरोपात एक्स्पोर्ट होणार्या ‘टेरी-टोवेल्स’ वरील चित्रे पाहून मुलांना गम्मत वाटली. आकर्षक रंग आणि चित्रांचे टॉवेल स्वस्त दरात खरेदी करण्याचा आनंदही मुलांनी लुटला.

 

टॉवेल factoryला भेट

बालरंजन-कांद्राची-मुले-संचालिका-माधुरी-सहस्रबुद्धे-यांच्या-सोबत-टॉवेल-factory-पाहताना

टॉवेल factoryला भेट

factoryतील-तयार-होणारे-टॉवेल