‘गाण्यांचा पाऊस’ पुस्तकाचे प्रकाशन

दिनांक: २६ ऑक्टोबर, २०१५

डावीकडून-माधुरी-सहस्रबुद्धे-अनुराधा-पंडित-सिंधुताई-अंबिके-व-बालरंजन-केंद्रातील-मुले

‘गाण्यांचा पाऊस’ पुस्तकाचे प्रकाशन

'गाण्यांचा पाऊस' पुस्तकाचे प्रकाशन

‘गाण्यांचा पाऊस’ पुस्तकाचे प्रकाशन

बालरंजन केंद्राच्या ‘गाण्यांचा पाऊस – भाग २’ चे प्रकाशन श्रीमती अनुराधा पंडित यांच्या हस्ते आज झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालकारणी सिंधुताई अंबिके या होत्या .

“बालरंजन केंद्राचे हे चौथे  पुस्तक प्रकाशित झाले. ह्यात १२१ बालगीतांचा संग्रह आहे. नवीन पालकांसाठी अंगाई गीते व शिशु गीते यांचा मुद्दाम समावेश केला आहे. याखेरीज बालगीते, प्रार्थना, अभिनय गीते तसेच काही हिंदी गाण्यांचाही समावेश केलेला आहे. आमच्या केंद्रातील मुलांना आनंद देणारी गाणी इतर मुलांपर्यंत पोहोचावीत यासाठी हा खटाटोप असल्याचे” संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

यावेळी अनुराधा पंडित यांनी कोजागिरी निमित्त चांदोबाची गाणी सांगून मुलांबरोबर अक्षरश:धमाल केली. पालक वर्गही आपले वय विसरून मुलांसमवेत गाणी म्हणण्यात रंगून गेले.

वयाची पंच्याऐंशी वर्षे पार केलेल्या सिंधुताईनी खणखणीत आवाजात, हातवाऱ्यासह, सांगितलेल्या गाण्यांनी उपस्थित सर्वजण भारावून गेले. आशा होनवाड व प्रज्ञा गोवईकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणात ‘गाण्यांचा पाऊस’चा प्रकाशन समारंभ पार पडला.