बालरंजन केंद्रातील ‘सोलर वाॅक’

दिनांक: २१ मे, २०१५

लहान मुलांना आपल्या सूर्यमालेविषयी कुतूहल असतं. ग्राहगोलांविषयी त्यांना अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने सुट्टीत खास कार्यक्रम आयोजित केला होता.

मुलांनी घातलेल्या कपड्यांच्या रंगाला अनुसरून त्यांना एक-एक ग्रह बनविले गेले. त्या ग्रहाच्या नावाची पाटी त्यांच्या गळ्यात घातली होती. आपली सोलर सिस्टीम किती मोठी आहे हे साय-फाय वंडर्सच्या डॉ. रेणुका दिवाण- करंदीकर यांनी मुलांना समजाविले. “जर दोन्ही हात पसरून लांब केल्यावर होणार्या आकाराचा सूर्य असेल तर ‘मटाराच्या दाण्याएवढी’ पृथ्वी असते व ‘बडीशेपेच्या गोळीएवढा’ प्लुटो असतो” असे त्या म्हणाल्या. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह तर गुरु, शनी, युरेनस, नेप्चून आणि प्लुटो हे बहिर्ग्रह असतात. ह्या ग्रहांना क्रमाने उभे करून मुलांनी पावले मोजून हा वाॅक केला. मुलांचे एक पाउल बरोबर ‘छत्तीस दशलक्ष मैल’ असे हे प्रमाण होते.

“अशा या ग्रह बनलेल्या मुलांबरोबर आपल्या सूर्यमालेत भ्रमण करण्याचा आनंद संध्याकाळच्या आल्हाददायक हवेत मुलांनी घेतला. मनोरंजनाबरोबरच ज्ञान मिळवण्याची संधी या निमित्ताने सर्वाना आम्ही उपलब्ध करून दिली” असे केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.

बालरंजन-केंद्रातील-solar-walk

बालरंजन-केंद्रातील-solar-walk