दिनांक: २२ एप्रिल, २०१५
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात ‘कथाकथन व रसपान’ हा वार्षिक कार्यक्रम नुकताच पार पडला. मुलांच्या क्षेत्रात गेली तीस वर्षे काम करणाऱ्या शोभा भागवत यांचे कथाकथन ऐकण्यात मुले रंगून गेली.
‘तूच ना माझी आई’, ‘मांजरांची वरात’, ‘काजव्याची गोष्ट’ या गोष्टी छोट्या मुलांना भावल्या तर दोन रोबोंच्या विज्ञानकथेनी मोठ्या मुलांना भुरळ घातली. “भाषा विकासासाठी कथाकथन हे उत्तम मध्यम आहे. त्यातून मुलांची शब्दसंपत्ती वाढते आणि गोष्टीच्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार होतात. यासाठी सुट्टीमध्ये अशा कार्यक्रमांचे आम्ही आवर्जून आयोजन करतो” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले. सौ.दीप्ती कौलगुड यांनी आभार प्रदर्शन केले.
त्यानंतर सर्व मुलांनी ‘उसाच्या रसाचा’ आस्वाद घेतला. पुणे शहरातील कचर्याची समस्या लक्षात घेऊन, प्लास्टिक अथवा कागदी ग्लास न वापरता घरून आणलेल्या स्टीलच्या पेल्याने मुलांनी रस प्यायला.