वंचितांना दया नको !

दिनांक: १६ जून, २०१५

“वंचितांना दया दाखवू नका. उलट त्यांच्याशी संवादाने, स्पर्शाने नाते जोडा तरच ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ गटातील दरी मिटेल. अनाथ मुले स्पर्शासाठी आसुसलेली असतात. त्यांना प्रेमाने जवळ घ्या” असे उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी काढले. बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात त्या बोलत होत्या. मुलांमध्ये दानाची संकल्पना रुजावी यासाठी दर अधिक महिन्यात बालरंजन केंद्रातर्फे मुलांकडून मदत जमवून मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दिली जाते. यावर्षी ही मदत ‘एकलव्य आरोग्य व शिक्षण न्यास’ या संस्थेला देण्याचे बालरंजन केंद्राने निश्चित केले आहे. त्या निमित्ताने अधिक मासाच्या पूर्व संध्येला केंद्राने हा कार्यक्रम आयोजित केला होता. पुढील एक महिना मुलांनी व पालकांनी ही मदत द्यावी असे आवाहन बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.

‘मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सामाजिक जाणीवेचा विकास होत असताना देणार्यालाही त्यातून काहीतरी मिळत असते हा नवा विचार रेणू गावस्कर यांच्यामुळे आज उपस्थितांना मिळाला’ असे सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी समारोप करताना सांगितले. सौ.अशा होनवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

बालरंजन-केंद्रात-बोलताना-रेणुताई-गावस्कर

बालरंजन-केंद्रात-बोलताना-रेणुताई-गावस्कर