आत्मसन्मान कसा उंचावाल ?

दिनांक: १० मार्च २०१५

“उच्च आत्मसन्मान असलेली व्यक्ती ठामपणे व्यक्त होते, इतरांची काळजी घेते आणि कायम आशावादी असते. सतत कार्यरत असणे, जीवनात रस घेणे, आणि नवनवे छंद जोपासणे ही त्यांची वैशिष्ठ्ये असतात. अश्या व्यक्ती समंजस असून त्यांची मानसिकता दातृत्वाची असते” असे मत राविबाला काकतकर यांनी व्यक्त केले. बालरंजन केंद्राच्या ‘सुजाण पालक मंडळात’ त्या बोलत होत्या. आत्मसन्मान कसा उन्चावाल याबाबत सौ.काकतकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. “स्वतःत बदल घडवायचा असेल तर प्रथम स्वतःशी असलेला संवाद वाढविणे गरजेचे आहे. हा स्व-संवाद सकारात्मक करावा. गुणदोषांसह स्वतःला स्वीकारून स्वतःवर प्रेम केल्यास महिलांचा आत्मसन्मान उंचावेल” असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी विविध खेळ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांना त्यात सहभागी करून घेतले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-पालकांसाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. पालकांनी मुलांच्या अपयशाचे उल्लेख वारंवार केल्यास त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचतो. म्हणून पालकांनी  स्वतःचा व मुलांचा आत्मसन्मान जपावा असे आवाहन सौ.सहस्रबुद्धे यांनी यावेळी केले. सौ.प्रज्ञा गोवइकर यांनी आभार मानले.

बालरंजन-केंद्राच्या-सुजाण-पालक-मंडळात-बोलताना-राविबाला-काकतकर

बालरंजन-केंद्राच्या-सुजाण-पालक-मंडळात-बोलताना-राविबाला-काकतकर

बालरंजन-केंद्राच्या-सुजाण-पालक-मंडळात-बोलताना-राविबाला-काकतकर

बालरंजन-केंद्राच्या-सुजाण-पालक-मंडळात-बोलताना-राविबाला-काकतकर