निरीक्षणशक्तीचे महत्व!

दिनांक: १० सप्टेंबर, २०१५

शिक्षणतज्ञ रजनी दाते प्रयोग करून दाखविताना

शिक्षणतज्ञ रजनी दाते प्रयोग करून दाखविताना

बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात, “मुलांची निरीक्षणशक्ती कशी वाढवावी ?” या विषयावरील व्याक्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रजनी दाते यांनी हा विषय अतिशय सोप्या भाषेत विषद केला. ‘निरीक्षणाचे’ विविध रंजक प्रयोग त्यांनी पालकांकडून करून घेतले. “मुलांना कोडी घालून विचार करायला लावा. तसेच घरापासून शाळेपर्यंतचा नकाशा काढायला त्यांना शिकवा. शहरातली प्रेक्षणीय स्थळे मुलांना जशी दाखवाल, तसेच दव, धुकं, वारा, पाऊस याचाही अनुभव मुलांना घेउद्या” असे रजनीताई यांनी यावेळी सांगितले.

“संशोधनासाठी ‘निरीक्षण’ ही मुलभूत गोष्ट असल्याने, मुलांमध्ये हे कौशल्य वाढीस लागावे यासाठी ह्या व्याख्यानाचे मुद्दाम आयोजन ले” असे बालरंजन च्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या.

सौ.अशा होनवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सौ.किशोरी कुलकर्णी यांनी आभार मानले.