‘ग्लोबल हार्मनी २०१५’ मध्ये बालरंजनचे ‘ड्रामेबाज’ प्रथम!!

दिनांक: ३ जून, २०१५

नुकत्याच पुण्यात झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या ‘ग्लोबल हार्मनी २०१५’ या स्पर्धेत बालनाट्य विभागात बालरंजन केंद्राने ‘प्रथम’ क्रमांक पटकावला. याचा पारितोषक वितरण समारंभ पं. सुरेश तळवलकरांच्या हस्ते झाला. यावेळी श्री.हेमंत वाघ, सौ.रत्ना वाघ व श्री.श्याम भुर्के उपस्थित होते.

टी.व्ही. वरील रियालिटी शोवर आधारित ‘ड्रामेबाज’ या नाटकाने हे यश मिळविले. या बालनाट्याचे लेखन विनिता पिंपळखरे यांचे होते तर दिग्दर्शन श्री.देवेंद्र भिडे यांनी केले होते. ‘भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्याची सुरुवात अखिल भारतीय पातळीवरील नाट्य-स्पर्धेतील घवघवीत यशाने झाल्याचे’ संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

ड्रामेबाज-सादर-करताना-बालरंजन-केंद्राचे-बाल-कलाकार

ड्रामेबाज-सादर-करताना-बालरंजन-केंद्राचे-बाल-कलाकार

पं-सुरेश-तळवलकरांच्या-हस्ते-बक्षीस-स्वीकारताना-बालरंजन-केंद्राची-मुले

पं-सुरेश-तळवलकरांच्या-हस्ते-बक्षीस-स्वीकारताना-बालरंजन-केंद्राची-मुले