आरोग्य पावलांचे!

दिनांक: ११ ऑगस्ट, २०१५

बालरंजन केंद्रात मार्गदर्शन करताना डॉ.मीनाक्षी पंडित

बालरंजन केंद्रात मार्गदर्शन करताना डॉ.मीनाक्षी पंडित

‘मुलांच्या पावलांची ठेवण योग्य आहे का? आणि नसल्यास ती कशी सुधारायची?’ याचं मार्गदर्शन डॉ.मीनाक्षी पंडित यांनी बालरंजन केंद्रातील पालकांना केले. बालरंजन केंद्राच्या ‘सुजाण पालक मंडळात’ एका आगळ्या वेगळ्या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वयाच्या पहिल्या वर्षापासून ते जीवनाच्या अंतापर्यंत माणूस चालत असतो. सर्वसाधारणपणे मूल आठ वर्षांचे झाल्यावर त्याची ‘चाल’ निश्चित झालेली असते. पावलाची ठेवण व चाल योग्य नसेल तर वयाच्या चाळीशीच्या आतच मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यासारख्या व्याधी जडतात. त्यामुळे, या वयातच ही चाल बरोबर आहे ना हे पाहणे गरजेचे असते. या कार्यक्रमात डॉ.पंडित यांनी सुमारे २५ मुलांचे ‘फुट ईव्हाल्युएशन’ केले व पालकांना मार्गदर्शन केले.

पाण्यात पाय बुडवून त्याचा ठसा फरशीवर उमटविला तर प्रत्येकाचे पावलांचे आकार वेगळे दिसतात. ते पाहून आपला ठसा नॉर्मल आहे का हे तपासून पाहण्याची सोपी युक्ती डॉ.पंडित यांनी मुलांना सांगितली.

यावेळी बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे उपस्थित होत्या. वर्षा बरिदे यांनी आभारप्रदर्शन केले.