गप्पा गौरीश गावडेशी

दिनांक: २१ जुलै, २०१५

किल्ला सिनेमातील ‘युवराज’- गौरीश गावडे हा बालरंजन केंद्राचा माजी विद्यार्थी. आपल्या ह्या  मित्राचा सिनेमा ‘किल्ला’ बालरंजन केंद्राच्या मुलांनी एकत्र पहिला. त्या निमित्ताने गौरीशशी गप्पा मारण्याचा कार्यक्रम बालरंजन केंद्राने आयोजित केला होता. सिनेमा पाहताना पडलेले प्रश्न मुलांनी त्याला विचारले आणि शुटींगच्या वेळच्या त्याच्या गमती-जमती ऐकताना मुले रंगून गेली. गौरीशचे वडील श्री.रामदास गावडेही यावेळी उपस्थित होते. ‘बालरंजन केंद्राने केलेल्या कौतुकाने मी भारावून गेलो आहे’ अशी भावना यावेळी गौरीशने व्यक्त केली.

“बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गातील मुलांना अनेक संधी मिळतात. त्यातून पुढे गेलेल्या मुलांचे अनुभव आताच्या छोट्या मुलांना समृद्ध करतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन मोलाचे ठरते” असे याप्रसंगी संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

किल्ला-सिनेमातील-बालकलाकार-गौरीश-गावडे-बालरंजन-केंद्रातील-मुलांसमवेत

किल्ला-सिनेमातील-बालकलाकार-गौरीश-गावडे-बालरंजन-केंद्रातील-मुलांसमवेत