दिनांक: १३ मार्च, २०१९
परीक्षेच्या दिवसात बालरंजन केंद्रात अभ्यास विषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा
बालरंजन केंद्राचे माजी विद्यार्थी दीपिका पाठक व चिन्मय कार्लेकर यांनी, जस्ट बुक्स डेक्कन जिमखाना तर्फे या स्पर्धेचे आयोजन केले होते.त्यांना अमिता पाठक व सागर कार्लेकर यांनी मदत केली. बालरंजन केंद्राच्या खुल्या रंगमंचावर ही स्पर्धा संपन्न झाली.
अगदी ३ वर्षे वयापासून ते खुल्या गटापर्यंत, एकूण ६ गटात स्पर्धा घेण्यात आली. गटवार सोप्यापासून ते अवघड अशी स्पेलिंग त्यांनी मुलांना विचारली. ४ – ५ वर्षापासून मुलांनी पहिल्या फेरीत ती लिहिली तर दुसर्या फेरीत तोंडी पटापट सांगितली. सह गटात मिळून सुमारे २०० जण त्यात सहभागी झाले. यावेळी मुले व पालकांसाठी पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
निधी वाळिंबे, श्रेयस डोळस, विवान आगरकर, आभा बापट, वैदेही फडके ही मुले तसेच सत्तर वर्षांचे आजोबा श्री. विजय नूलकर आपापल्या गटातील विजेते ठरले. त्यांना बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरीताई सहस्रबुद्धे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. मंजिरी पेठे यांनी सूत्रसंचालन केले.