सकारात्मक शिस्त

दिनांक: ११ मार्च, २०१९
 
“आपल्याकडे शिस्तीची पारंपारिक कल्पना ही ‘शिस्त म्हणजे मार, आरडाओरडा, रागावणे अशीच होती. मात्र ही ‘ नकारात्मक शिस्त ‘ आहे. मुलांना समजावून सांगून त्यांच्यात होणारे बदल हे चिरकाल टिकतात. ह्याला सकारात्मक शिस्त म्हणतात आणि ती शिस्त लहानपणीच लावणे गरजेचे असते.” असे डॉ.स्वाती भावे यांनी पालकांना सांगितले.
 
बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केंद्राच्या ‘ सुजाण पालक मंडळात ‘
डॉ. भावे यांचे ‘ सकारात्मक शिस्त ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळाला आता ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून दर महिन्यात एक कार्यक्रम केंद्रात आयोजित करण्यात येतो. पालकांना पालकत्वाची वाट सुकर व्हावी यासाठी सातत्याने हा उपक्रम चालू ठेवला असल्याचे त्या म्हणाल्या. कालानुरूप त्यातील प्रश्न बदलत राहतात. पण त्यावर उत्तरे शोधणे अनिवार्य असते असेही त्यांनी सांगितले.
 
मुलांना शिस्त लावणे ही पालकांची जबाबदारी असून त्यासाठी आपणच मुलांचे ‘ रोल मॉडेल ‘ व्हावे असे डॉ. भावे म्हणाल्या. त्यासाठी कुटुंबातील सदस्यात एकवाक्यता हवी तसेच शिस्त लावण्यात सातत्य हवे.
 
डॉ.शर्मिला गुजर, डॉ. अश्विनी कुंडलकर, ऍड. सुजाता हिंगणे व डॉ. भावे यांनी सादर केलेल्या 
‘रोल प्ले’ मुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. त्यांनी तोच प्रसंग एकदा नकारात्मक व एकदा सकारात्मक पद्धतीने नाट्यरूपात करून दाखविला. पालकांना तो भावला. प्रत्येक गोष्टीचे बरे वाईट परिणाम पाल्यांना समजावून सांगितले तर शिस्त लावणे सुकर होते ही बाब पालकांच्या निदर्शनास आली. 
पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. स्वाती भावे यांनी समर्पक उत्तरे दिली.मंजिरी पेठे यांनी आभारप्रदर्शन केले. 
 
सुजाता हिंगणे, डॉ.शर्मिला गुजर, डॉ.अश्विनी कुंडलकर व डॉ.स्वाती भावे

सुजाता हिंगणे, डॉ.शर्मिला गुजर, डॉ.अश्विनी कुंडलकर व डॉ.स्वाती भावे