‘बालरंजन’ चे ३२ व्या वर्षात पदार्पण !

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने काल २३ जानेवारी रोजी आपली ३१ वर्षांची वाटचाल पूर्ण करून ३२ व्या वर्षात पदार्पण केले. या वर्धापनदिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्ता कोहिनकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्र.चिं. शेजवलकर होते तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त श्री. विशालजी सोळंकी हे होते.
 
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी बालरंजन केंद्राची स्थापना करून, गेली ३१ वर्षे सातत्याने आणि चिकाटीने चालविल्याबद्दल माधुरीताईंचे डॉ.शेजवलकर यांनी अभिनंदन केले. बालरंजन केंद्राच्या मुलांनी ‘ बेंचेस ‘ म्हणजेच ‘बाक’ हे एकच उपकरण वापरून सादर केलेल्या वैविध्यपूर्ण प्रात्यक्षिकाचे कौतुक केले. बालरंजन केंद्र हे भारती निवास सोसायटीचे भूषण असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
‘जेथे नीती, तेथे कुठली भीती’ असे सांगून डॉ.कोहिनकर यांनी पालकांना, मुलांना नैतिकतेचे धडे देण्याचे आवाहन केले.
 
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आवर्जून उपस्थित राहून बालरंजनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.” यावर्षी नवीन १३ शाळा सुरु करण्यात येणार असून त्यातील अभ्यासक्रमाची नाळ आपल्या संस्कृतीशी जोडलेली असेल ” असे सांगितले.
 
केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी मुलांच्य वाढत्या स्क्रीन अडीक्षन बाबत चिंता व्यक्त केली आणि मैदानी खेळ खेळण्याची गरज प्रतिपादन केली. मुलांची बहारदार प्रात्याक्षिके साऱ्यांनाच आवडली.मंजिरी पेठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी शोभा भागवत, डॉ.अनुराधा सहस्रबुद्धे, डॉ. विदुला म्हैसकर, मृणालिनी वनारसे,सुप्रिया पाटील, सौ. बहुलीकर अशी बालकारणी मंडळी उपस्थित होती. भारती निवास सोसायटीचे पदाधिकारी संजय गोखले,चंद्रकांत नातू, श्रीराम सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.  
 
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्ता कोहिनकर

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्ता कोहिनकर

 

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी

 

'बालरंजन' चे ३२ व्या वर्षात पदार्पण

वैविध्यपूर्ण प्रात्यक्षिके

 

'बालरंजन' चे ३२ व्या वर्षात पदार्पण

वैविध्यपूर्ण प्रात्यक्षिके