‘प्रकाशगान’ ची रंगली सुरेल मैफिल

दिनांक: २९ जानेवारी, २०१९

अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेच्या अनामप्रेम या दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या विभागाने अंध कलाकारांची सुरेल मैफिल भारती निवास सोसायटीत सादर केली. पुणे शहरातील हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम होता. पुणेकर रसिकांनी त्याला उत्तम दाद दिली.

बालरंजन केंद्राच्या ३१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.”मुलांमध्ये बालपणीच सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि दिव्यांग मुले ही समाजाचाच भाग असून त्यांना मदत करण्याची भावना सामान्य मुलांमध्ये रुजविणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका आणि नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.

अंध असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ही मुले वाद्ये वाजवितात, गाणी म्हणतात. भिक्षेच्या करवंत्या हातात न घेता वस्तुस्थितीचा स्वीकार करून ही मुले उत्साहाने गाणी म्हणतात. स्वतःचे दुख्ख कुरवाळत न बसता इतरांचे मनोरंजन करतात हे विशेष असल्याचेही माधुरीताई म्हणाल्या.

जहा डाल डालपर सोनेकी…..वो भारत देश है मेरा, असावा सुंदर चोक्लेटचा बंगला,ए आई मला पावसात जाऊ दे,पाप कहते है बडा नाम करेगा यासारखी मुलांना आवडणारी गाणी त्यांनी सादर केली. साहजिकच सर्व मुलांनी त्यावर टाळ्यांनी ठेका धरला. गोरी गोरी पान फुलासारखी छान या गाण्याला मुलांनी ‘वन्स मोअर’ ही दिला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. अभय गोखले यांनी केले.

यावेळी अनामप्रेम चे श्री. अजित कुलकर्णी, डॉ. प्रकाश शेठ, ज्योती एकबोटे, डॉ. सायली सोमण,श्री.सतीश सोमण, गुरुनाथ देसाई आदी उपस्थित होते. चिपळूणच्या नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे याही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित पालकांनी तसेच भारती महिला मंडळातील भगिनींनी उत्स्फूर्तपणे दिलेला निधी माधुरीताईंनी अनामप्रेमचे संस्थापक श्री. अजित कुलकर्णी यांचेकडे सुपूर्त केला. आशा होनवाड यांनी आभारप्रदर्शन केले.  

अनामप्रेम-चे-दिव्यांग-कलाकार-प्रकाशगान-कार्यक्रम-सादर-करताना

अनामप्रेम-चे-दिव्यांग-कलाकार-प्रकाशगान-कार्यक्रम-सादर-करताना

 

 नगरसेविका-सौ.-माधुरी-सहस्रबुद्धे-श्री.-अजित-कुलकर्णी-यांचा-सत्कार-करताना


नगरसेविका-सौ.-माधुरी-सहस्रबुद्धे-श्री.-अजित-कुलकर्णी-यांचा-सत्कार-करताना