व्हर्टीगो आणि बॅलन्स (Vertigo & Balance)

दिनांक: ७ मार्च, २०१८

व्हर्टीगो आणि बॅलन्स ( Vertigo & Balance )

बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात फ़िजिओथेरपिस्ट  डॉ. मीनाक्षी पंडित व कान नाक घसा तज्ञ डॉ.स्वानंद घोलप यांनी ‘ व्हर्तीगो आणि बलांस ‘ या विषयावर मार्गदर्शन केले.

“कानाचे काम हे ऐकू येणे व आपलं तोल सांभाळणे हे असते. ध्वनी तसेच वायु प्रदूषणामुळे कान नाक घशाच्या तक्रारीत वाढ होते.मोबाईलच्या अतिवापराने तक्रारीत भर पडते.शिक्षक तसेच गायकांना घशाचा त्रास होऊ शकतो. हवेच्या प्रदुषणापासून मुलांना वाचविण्यासाठी मास्कचा वापर करावा. लहान मुले घोरत असतील तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते ” असे डॉ. स्वानंद घोलप यांनी पालकांना सांगितले. 

” चक्कर येण्याची जवळ जवळ ३०० कारणे आहेत.सामान्यतः व्यक्ती ३५% बालन्सिंग सिस्टीम वापरत असते.”असेही ते म्हणाले.

डॉ. पंडित म्हणाल्या,” शरीराचा तोल हा मुख्यत्वे स्नायूंवर अवलंबून असतो.नियमितपणे केलेला व्यायाम स्नायुतले वंगण व्यवस्थित ठेवतो.चक्कर येण्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो.

आपला ‘कोअर’ मजबूत ठेवला तर आरोग्य चांगले रहाते.स्नायुंना पाणी कमी पडले तर ते दुखू लागतात. म्हणून तहान लागण्या अगोदरच पाणी प्यावे .”

शेवटी डॉ.मीनाक्षी पंडित यांनी उपस्थितांकडून चक्कर येऊ नये यासाठी करायचे पाच व्यायामप्रकार करून घेतले.सुर्यनमस्काराची पहिली स्थिती हा चक्कर येऊ नये म्हणून उत्तम व्यायाम आहे.असे त्यांनी सांगितले.

बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या,” चक्कर येऊ नये यासाठी मणक्यांचे आरोग्य सांभाळले पाहिजे.” यानिमित्ताने सुजाण पालक मंडळात एक वेगळा विषय हाताळला गेल्याचे माधुरी ताईंनी सांगितले. दीपाली बोरा यांनी आभारप्रदर्शन केले. 

 यावेळी दिवंगत साहित्यिका डॉ. लीलाताई दिक्षित यांच्या स्मरणार्थ केंद्रास दिलेल्या देणगीबद्दल, त्यांच्या कन्या डॉ. अरुणा कुलकर्णी यांचा माधुरीताईच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Vertigo & Balance

Vertigo & Balance