ए भाय, जरा देखके चलो I

दिनांक: २१ मे, २०१८
 
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी एका पथनाट्याचे आयोजन केले होते. लहान वयातच मुलांवर वाहतुकीचे नियम पाळण्याचे संस्कार व्हायला हवेत यासाठी ‘ रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा ‘ या विषयावर हे पथनाट्य सादर करण्यात आले.
 
‘नाटकघर’ ह्या कंपनी तर्फे श्री. शाहू सावेकर आणि त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी हे परिणामकारक पथनाट्य सादरीकरण केले.’ए भाय, जरा देखके चलो’ या गाण्याने सुरु झालेले हे नाट्य ‘ हम होंगे कामयाब’
या आशावादाने संपले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे परिवहन प्रमुख श्री.संजय राऊत उपस्थित होते. त्यांनी मुलांशी संवाद साधला.
 
” वाहतूक व्यवस्थित , शिस्तीने आणि शांततेत चालली तर सर्वाना सोयीचे होईल. हॉर्न वाजवायची गरज पडू नये असे वातावरण निर्माण झाले तरच आपण सुखी जीवन जगू शकू.”
 
ह्या पथनाट्यातून  मुलांनी काय बोध घेतला ते जाणून घेण्यासाठी राऊत साहेबांनी मुलांना प्रश्न विचारले.बरोबर उत्तरे देणाऱ्या मुलामुलींना मिळालेले रिस्ट band कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
 
सीमा अंबिके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.यावेळी प्रभाग १३ मधील मनपाच्या शाळेतील रुद्रेश या विद्यार्थ्याची बालवार्ताहर म्हणून रशियातील मोस्को येथे होणार्या फिफा करंडक फुटबाल स्पर्धेचे वार्तांकन करण्यासाठी निवड झाल्याबद्दल नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 
ए भाय, जरा देखके चलो I

ए भाय, जरा देखके चलो ।

 

ए भाय, जरा देखके चलो I

ए भाय, जरा देखके चलो ।