नाट्यवर्ग समारोप २०१८-१९

दिनांक: २२ डिसेंबर, २०१८

“शिक्षणाबरोबरच मन:शांतीसाठी मुलांनी कला जोपासणे आवश्यक आहे.माझ्या मते ‘ नाटक’ ही सर्वोत्तम कला आहे.रंगभूमीवर आपण स्वतःला विसरून जातो. भूमिका करताना, ती जगताना जीवनाची अनुभूती मिळते.तसेच लोकांनाही वेगळी अनुभूती देता येते.नाटक हा जिवंत अनुभव असल्याने त्यातील आदानप्रदान फार महत्वाचे असते.नाटकामुळे ते सादर करणाऱ्यांचे व प्रेक्षकांचेही आयुष्य समृद्ध होते.” असे नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी सांगितले.

बालरंजन केंद्राच्या साप्ताहिक सहामाही नाट्यवर्गाच्या २८ व्या वर्षाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी मुलांनी पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त बसविलेले ‘ चितळे मास्तर’ हे नाटक सादर केले. त्यानंतर गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या बालकवितांवरील कार्यक्रम 

‘बिनभिंतीची शाळा’ सादर करण्यात आला.’ वाहनांचा डोंगर’ या प्रदूषणावरील नाटकाने नात्यवर्गाचा समारोप झाला.

बालरंजन केंद्राच्या संचालिका आणि नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यावेळी मुले आणि पालकांना संबोधित करताना म्हणाल्या,”नाटक हे बालकांच्या व्यक्तिमत्वविकासाचे साधन आहे. या माध्यमातून मुले फुलताना पहाणे फार आनंददायी असते.मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.त्यांचा आत्मविश्वास वाढतो. योग्य स्वप्रतिमा निर्माण होण्यास मदत होते.”    

नाट्यवर्गाचे मार्गदर्शक श्री. देवेंद्र व सौ. रेणुका भिडे तसेच रश्मी जोशी यांचा मा. कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अपर्णा चोथे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रज्ञा गोवेकर व दीप्ती कौलगुड यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले होते.

प्रमुख पाहुण्या कीर्ती शिलेदार

प्रमुख पाहुण्या कीर्ती शिलेदार

चितळे मास्तर

चितळे मास्तर

चितळे मास्तर

चितळे मास्तर