कथारंग

 दिनांक: १९  जून, २०१८

‘गोष्ट’ हा प्रकार बच्चे कंपनीला फारच आवडतो. कथारंग कार्यक्रमात आज प्रसन्ना हुल्लीकवी व इरा हुल्लीकवी या मायलेकींनी बालरंजन केंद्रात धमाल उडवून दिली. यावेळी प्रसन्ना यांनी आवाजातील चढउतारासह राजाराणीची नवी गोष्ट मुलांना सांगितली. मग पपेट वापरून एका म्हाताऱ्या आजीची कथाही सांगितली.त्यात बऱ्याच प्राण्यांची पपेट आल्याने मुलांना गंमत वाटली.

त्यानंतर चड्डी चोरणाऱ्या एलियन्सची गोष्ट मुलांना फारच भावली. चिक्कू जोकरने मजा आणली.

सफरचंदातील ‘ स्टार ‘ पाहून मुलेच काय मोठी माणसेही थक्क झाली. आता सफरचंद नेहमीच्या पद्धतीने न चिरता आडवे कापण्याचा निर्धार मुलांनी यावेळी केला.

बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या,”गोष्टींमुळे मुलांच्या शब्दसंपत्तीत भर पडते. कल्पनाशक्ती वाढीला लागते. पपेट वापरल्याने गोष्टीची रंगत वाढते. प्रसन्ना व इरा हुल्लीकवी यांनी पुस्तके व पपेट ही माध्यमे वापरल्यामुळे मुलांना गम्मत वाटली.”

प्रज्ञा गोवईकर यांनी आभार मानले. यावेळी सुजाता मोगल, सुषमा दातार व चिन्मय केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डावीकडून इरा हुल्लीकवी, प्रसन्ना हुल्लीकवी व माधुरी सहस्रबुद्धे

डावीकडून इरा हुल्लीकवी, प्रसन्ना हुल्लीकवी व माधुरी सहस्रबुद्धे