आठवण सैनिकांची!

दिनांक: २४ जानेवारी, २०१८ 

“आपण कुठलाही आनंद साजरा करीत असताना,देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची आठवण ठेवली पाहिजे.” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या. बालरंजन केंद्राचा ३० वा वर्धापनदिन आणि ६९ वा भारतीय प्रजासत्ताकदिन यांचे औचित्य साधून ‘ कारगिल-एक शौर्यगाथा ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला.लक्ष्य फौंडेशनच्या अश्विनी पळणीटकर व हेमलता रेणके यांनी तो प्रभावीपणे सादर केला.

कारगिल युद्धातील चार शूर जवानांची कामगिरी त्यांनी गोष्टी रूपाने मुलांना सांगितली.

मनोजकुमार पांडे,विक्रम बात्रा,योगेंद्रसिंग यादव व संजय कुमार हेच ते चार हिरो. या रिअल लाईफ हिरोंना मुलांनी वंदन केले.एकाग्रतेनी मुलांनी हे दृक-श्राव्य सादरीकरण पहिले.सैनिकांच्या शौर्याने प्रेरित झालेल्या मुलांनी हाताने ताल देऊन शौर्यगीत म्हटले.दर २६ जुलैला कारगिल विजयदिन साजरा केला जातो. 

लक्ष्य फौंडेशनचे श्री.गुरुनाथ प्रभुदेसाई यांचा नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माधुरीताईंनी केलेल्या सैनिकांसाठी मदतीच्या आवाहनाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.दीप्ती कौलगुड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रज्ञा गोवईकर यांनी आभार प्रदर्शन केले. 

आठवण सैनिकांची!