गाण्यांचा पाऊस

दिनांक: ३१ जुलै,२०१८

“बालरंजन केंद्रात पावसाळ्यात मुलांसाठी वेगळे उपक्रम घेतले जातात. या दिवसात त्यांना मैदानावर खेळायला मिळत नाही.अशावेळी आम्ही त्यांना गाणी शिकवितो ज्यायोगे मुलांचे पाठांतर होते, शब्दसंपत्ती वाढते, गाणी म्हणायची गोडी लागते आणि धीटपणा येतो.”असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

त्याचाच एक भाग म्हणून ‘गाण्यांचा पाऊस’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.बालरंजन केंद्राने प्रकाशित केलेल्या गाण्यांचा पाऊस भाग १,२,व 3 यातील निवडक १२ पावसाची गाणी मुलांनी अभिनयासह सादर केली. छोट्या मुलांमधली उत्स्फूर्तता वाखाणण्याजोगी होती.

अभिनेत्री सुजाता मोगल या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्या व त्यांची कन्या साजिरी यांचा माधुरी ताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मुलांचे सर्वकालीन लाडके पाउसगीत म्हणजे ग.दि.माडगुळकर यांचे ‘ नाच रे मोरा “. सुजाताताईंनी तेच गाणे मुलांकडून म्हणून घेतले. त्यामुळे छान वातावरण निर्मिती झाली.” मुलांचे बालपण जपण्यासाठी त्याला कला आणि क्रीडा यांचे खतपाणी घालायला हवे ” असे त्यांनी पालकांना आवर्जून सांगितले.

आशा होनवाड यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी पेठे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची संकल्पना सीमा अंबिके यांची होती तर रंगमंच सजावट दाऊद सुतार याने केली होती. कार्यक्रमानंतर पाण्याच्या एका मोठ्या टब मध्ये मुलांनी बोटी सोडण्याचा आनंद घेतला. विविध कार्यक्रमातून मुलांसाठी आनंदाची निर्मिती होते ती अशी.

गाण्यांचा पाऊस

गाण्यांचा पाऊस

 

अभिनेत्री सुजाता मोगल

अभिनेत्री सुजाता मोगल

 

गाण्यांचा पाऊस

गाण्यांचा पाऊस