बालरंजनची मुले पर्यावरणस्नेही

 दिनांक: २५ जून, २०१८
 
बालरंजन केंद्रात नेहमीच पर्यावरणविषयक कार्यक्रम राबविले जातात. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी मुलांना कापडी पिशव्यांच्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी या विषयीचे समूहगीत गायले. 
 
त्यानंतर सर्वांनी कापडी पिशव्या खिशात बाळगण्याचा संकल्प केला. पालकांकडून आधी जमा केलेल्या साड्या, ओढण्या, पडदे इ कापडांच्या पिशव्या माधुरीताईंनी आपल्याच प्रभागातील बचतगटाच्या महिलांकडून शिवून घेतल्या.त्या पिशव्यांचे वाटप आज करण्यात आले.
 
“मुलांचे मन संस्कारक्षम असते. लहानपणीच पर्यावरण रक्षणाचे संस्कार झाले तर त्यांचे वर्तन आयुष्यभरासाठी बदलते.यासाठी आज मुलांना त्यांची अशी खास पिशवी दिलीय.ती त्यांनी नेहमी खिशात बाळगून तिचा वारंवार उपयोग करावा अशी आमची अपेक्षा आहे.” असे माधुरीताइंनी यावेळी सांगितले.  
 
बालरंजनची मुले पर्यावरणस्नेही

बालरंजनची मुले पर्यावरणस्नेही