फुलोरा नाट्यछटांचा

दिनांक: ७ ऑगस्ट, २०१८
 
बालरंजन केंद्राचा हा वार्षिक कार्यक्रम असतो. बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गातील मुलामुलींना दरवर्षी नाट्यछटा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
 
” नाट्यछटा सादरीकरणातून 3 ते ५ मिनिटात मुलांच्या नाट्यगुणांची झलक प्रेक्षकांना मिळते. हा वैयक्तिक सादरीकरणाचा प्रकार असल्याने एकट्याला, कुठल्याही लवाजम्याशिवाय कुठेही सादर करता येतो.यातून अनेक मुलांना आजवर अभिनयाच्या संधी मिळाल्या आहेत.” असे केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले. 
 
एकूण १८ मुलांनी नाट्यछटा सादर केल्या. त्याद्वारे अनेक विषय प्रेक्षकांसमोर आले. चिमुकल्यांच्या या आविष्काराने मोठेही थक्क झाले.अभिनेत्री आरती पाठक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.” आमच्या पिढीपेक्षा ही मुले जास्त बिनधास्त आहेत.स्टेजवर आल्यावर प्रत्येकाच्या काळजात धकधक होते, क्वचित आपण एकदम ब्लांक होतो.( संवाद विसरून जातो) पण अशावेळी न घाबरता त्यातूनच शिकत पुढे जा.” असे आरती पाठक यांनी मुलांना सांगितले.
 
नाट्यवर्गाचे मार्गदर्शक श्री. देवेंद्र भिडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रश्मी जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर लता दामले यांनी आभार मानले.  
 
 
 
फुलोरा नाट्यछटांचा, या कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकवर्ग

फुलोरा नाट्यछटांचा, या कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकवर्ग

 

आरती पाठक यांचा सत्कार करताना माधुरी सहस्रबुद्धे

आरती पाठक यांचा सत्कार करताना माधुरी सहस्रबुद्धे