हसत खेळत भाषिक विकास

दिनांक: २५ सप्टेंबर, २०१८

बालरंजन केंद्रातील सुजाण पालक मंडळाच्या कार्यक्रमात सर्व पालक बनले पाच ते दहा वयोगटातील मुले आणि रंगला खेळाचा तास! पालकांनी आपल्या आवडीच्या रंगाचा फुगा निवडला, फुगवला आणि मनसोक्त उडवला. मानसी भागवत यांनी दिलेल्या सूचनांनुसार त्यांनी डाव्या हाताने, मग उजव्या हाताने, कधी कोपराने तर कधी खांद्याने फुगा उडवला.त्यातून दावे व उजवे या संकल्पना स्पष्ट झाल्या.
बलून पासिंगच्या खेळातून इंग्रजीतील डाव्या किंवा उजव्या बाजूस अर्धगोल असलेली अक्षरे ओळखण्याची गम्मत पालकांनी अनुभवली. तोंडाने ढूरर्र असा गाडी चालविल्याचा आवाज काढीत मग आपल्या शरीराचा वापर करीत दोघीदोघींनी गोल, त्रिकोण, चांदणी असे आकार तयार करणे यासारख्या कृती त्यांनी आनंदाने केल्या.

समुपदेशिका मानसी भागवत म्हणाल्या, “भाषा ही आपल्या भावना आणि विचारांची अभिव्यक्ती असते.मुलांना भाषेतून व्यक्त होऊ द्यावे”. त्याचबरोबर नृत्यातील हस्तमुद्रांचा वापर करून गोष्ट कशी सांगायची याचे प्रात्यक्षिक त्यांनी पालकांकडून करून घेतले. “ज्या कृती आपण उजव्या हाताने करतो त्या डाव्या हाताने करून पाहिल्यास उजवा मेंदूही वापरला जाईल. मुले जास्त सृजनशील होतील.” असेही त्या म्हणाल्या.

बालरंजनच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. ” आजच्या वक्त्या ह्या पालकांच्याच वयोगटातील असल्याने मानसी भागवत यांनी उत्तमरीत्या पालकांशी संवाद साधला” असे माधुरीताई म्हणाल्या. दहा वर्षांपर्यंत मुलांच्या भाषा विकासाकडे पालकांनी अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. किशोरी कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

हसत खेळत भाषिक विकास

हसत खेळत भाषिक विकास

 

हसत खेळत भाषिक विकास

हसत खेळत भाषिक विकास

 

हसत खेळत भाषिक विकास

हसत खेळत भाषिक विकास