‘रंजनकेन्द्री जिम्नास्टिक!’

दिनांक: १ मे, २०१८ 
 
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात रिक्रिएशनल जिम्नास्टिक शिबिराचा समारोप झाला.
पंधरा दिवसात मुले जे काही शिकली त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. ओंकार घाणेकर, आरती वेलणकर व प्रतिमा जोगदंड यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
 
बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.” आपण सगळेजण जन्मतः खूप लवचिक असतो पण मोठे होण्याच्या प्रक्रियेत ही लवचिकता घालवून बसतो.ही लवचिकता जपून ठेवण्यासाठी जिम्नास्टिक हा क्रीडाप्रकार फार उपयुक्त आहे. म्हणूनच अगदी छोट्या म्हणजे 3 ते ६ वर्षांच्या मुलांसाठी रंजनकेन्द्री जिम्नास्टिक चे शिबीर यंदा आम्ही आयोजित केले.”असे त्या म्हणाल्या.
 
ओंकार घाणेकर यांनी त्यांच्या ‘ व्हूप ‘ या संस्थेची तसेच सर्व क्रीडासाहित्याची ओळख उपस्थितांना करून दिली.बालान्सिंग बीम, सिंगल बार,विविध प्रकारचे अडथळे या साहित्यावर मुलांनी प्रात्याक्षिके सादर केली. रेवा जोगदंड हिच्या संगीतावरील जिम्नास्तिकने प्रेक्षकांची माने जिंकली. मार्गदर्शक ओंकारदादाने handstand करून सार्यांना थक्क केले.एकाग्रता व लवचिकतेचा सुरेख संगम सगळ्या प्रकारात बघायला मिळाला.
 
सीमा अंबिके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभारप्रदर्शन केले.   
 

'रंजनकेन्द्री जिम्नास्टिक !'

‘रंजनकेन्द्री जिम्नास्टिक !’

'रंजनकेन्द्री जिम्नास्टिक !'

‘रंजनकेन्द्री जिम्नास्टिक !’