‘बालरंजन’ने मारली बाजी !

दिनांक: ४ जून, २०१८
 
अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या “ग्लोबल हार्मनी” महोत्सवातील नाट्यस्पर्धेत, स्पर्धेच्या आठही विभागात बालरंजन केंद्राच्या ‘चितळे मास्तर’ नाटकाने प्रथम क्रमांकाची ८ बक्षिसे पटकावत बाजी मारली. पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील चितळे मास्तर या व्यक्तिरेखेवर आधारित सदर नाटक बालरंजन केंद्राने सादर केले होते.
 
त्याला खालीलप्रमाणे पुरस्कार प्राप्त झाले –  
 
१) सर्वोत्कृष्ठ नाटक- प्रथम क्रमांक –  निर्माती : माधुरी सहस्रबुद्धे.
२) नाट्यरुपांतर (लेखन) प्रथम-  देवेंद्र भिडे
३) दिग्दर्शन प्रथम –  देवेंद्र भिडे
४) नेपथ्य व प्रकाशयोजना प्रथम- देवेंद्र भिडे.
५) वैयक्तिक अभिनय – पुरुष- प्रथम- ऋग्वेद शेंडे
६) वैयक्तिक अभिनय – स्त्री- प्रथम – केतकी डिके
७) सहाय्यक अभिनेता-प्रथम- ध्रुव कुलकर्णी
८)सहाय्यक अभिनेत्री-प्रथम- रेवती देशपांडे
 
“भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या साप्ताहिक सहामाही नाट्यवर्गाचे  हे २८ वे वर्ष आहे. त्याची दमदार सुरूवात ह्या यशाने झाली” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. ‘पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा आमचा प्रयत्न राहील’ असेही त्या म्हणाल्या.
 
"ग्लोबल हार्मनी" - प्रथम क्रमांकाची ८ बक्षिसे

“ग्लोबल हार्मनी” – प्रथम क्रमांकाची ८ बक्षिसे

 
"ग्लोबल हार्मनी" - 'चितळे मास्तर'

“ग्लोबल हार्मनी” – ‘चितळे मास्तर’

"ग्लोबल हार्मनी" - 'चितळे मास्तर'

“ग्लोबल हार्मनी” – ‘चितळे मास्तर’