मातीच्या संपर्कात रहा!

दिनांक: ३० जानेवारी, २०१८ 

बालरंजन केंद्राच्या तिसाव्या वर्धापनाच्या निमित्ताने संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘ सुजाण पालक मंडळात ‘ एका अतिशय नवीन विषयावरील मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. आयसरचे डॉ. मिलिंद वाटवे यांनी वैद्यक शास्त्रातील ” इव्होल्यूशन मेडिसिन ” या शाखेकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. behavioural deficiency ची संकल्पना त्यांनी सोप्या मराठीत समजावून सांगितली.

समोरच्या वातावरणाशी मिळते जुळते घेण्यासाठी आपली फिजिकल केमिस्ट्री तयार झाली आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ग्रोथ factor ची जरुरी असते.जेव्हा आपण साहस करतो तेव्हा ते लाळेत तयार होतात आणि ते जखमा बऱ्या करू शकतात. पण आता आपल्याला जखमा होण्याची शक्यताच आपण नष्ट केलीय.त्यामुळे ग्रोथ फाक्तर तयार होत नाही. आपल्याला वर्षानुवर्ष मुंगी सुद्धा चावत नाही तर पांढऱ्या पेशी रक्तापर्यंत कशा जाणार?” असा प्रश्न त्यांनी केला.

चेंजिंग बिहेविअर वर उपाय म्हणजे खेळ ! शरीर न वापरल्यामुळे आपण त्याच्या क्षमता घालवून बसतो. एखादी गोष्ट आपल्याला जमली ही भावनाच आपले वय ५-१० वर्षांनी कमी करते.मातीच्या संपर्कात मुलांनी रहाणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. मुलांना मनसोक्त उन्डारू दे  ,त्यांना पावसात भिजू दे,उन्हात खेळू दे , थंडीत बाहेर पडू दे , चांदणे झेलू दे. कारण आपण वातावरणाशी किती एकरूप होतो याचा जीवनशैलीशी जवळचा संबंध आहे.प्राचीन काळी सुश्रुताने हेच सूत्र संस्कृत मध्ये सांगितलेले आहे, तेव्हा घालवलेल्या आपल्या क्षमता परत मिळवूया.” असेही डॉ. वाटवे म्हणाले.

 इतक्या सोप्या भाषेत ही संकल्पना स्पष्ट केल्याबद्दल दीपाली बोरा यांनी वाटवे सरांचे आभार मानले.  

डॉ. मिलिंद वाटवे

डॉ. मिलिंद वाटवे