सफर विश्वाची

दिनांक: ४ जून, २०१८

बालरंजन केंद्राला वर्षातून फक्त एक आठवडा सुट्टी असते. ही सुट्टी संपून आज मुले नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केंद्रात आली आणि नवीन उपक्रमाने आनंदित झाली. कारण त्यांना भेटण्यासाठी आपली सारी सूर्यमाला उपस्थित होती. संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बालरंजन केंद्राच्या पालक वृषाली केसकर यांनी हे ग्रह-तारे तयार केले होते.माधुरीताईंनी मुलांना प्रश्न विचारून बोलते केले. मुलांनी त्यांच्या रंग,आकार, कडी यावरून ग्रह ओळखले.

सूर्य,मंगळ,बुध,पृथ्वी,गुरु,शनी,नेपच्यून,युरेनस सारेकाही एकाच ठिकाणी मुलांनी पहिले. केवळ एव्हढेच नव्हे तर तीन अंतराळवीर व एक रोबोही अवकाशात जाण्यासाठी येथे तयार होता.

“अशा कार्यक्रमातून मुलांच्या विविध संकल्पना हसतखेळत विकसित होतात.”असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी पालकांना सांगितले.गौरी कालगावकर व सीमा अंबिके यांनी यावेळी सहकार्य केले. माधवी केसकर यांनी आभारप्रदर्शन केले.  

सफर विश्वाची

सफर विश्वाची

 

सफर विश्वाची

सफर विश्वाची