‘ वर्ल्ड वॉटर डे ‘ निमित्त पाणीबचतीची शपथ

दिनांक: २२ मार्च, २०१७

बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे व कर्नल शशिकांत दळवी यांनी मुले, ताई – दादा यांना जागतिक जलदिनानिमित्त पाणीबचतीची शपथ दिली. आज २२ मार्च हा ‘ वर्ल्ड वॉटर डे ‘ म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक मुलाच्या हातात पाण्याच्या प्रतिज्ञेचे प्लॅकार्ड देण्यात आले होते. मुलांनी या वेळी पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्याची व पाणी वाया न घालवण्याची शपथ घेतली. कर्नल शशिकांत दळवी यांनी पाण्याचं मोल मुलांना समजावून सांगितले. ” पृथ्वीवर १/३ जमीन असून २/३ भाग पाणी आहे. या पेकी फक्त १ टक्का पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. इतके दुर्मिळ असलेले हे पाणी आपण फुकट घालवता कामा नये. त्यातला थेंबनथेंब महत्वाचा आहे. तो योग्य प्रकारे आपण वापरला पाहिजे. यासाठीचे संस्कार बालवयातच होणे गरजेचे आहे म्हणून बालरंजननी हा पर्यावरणस्नेही उपक्रम घेतला आहे.”

डावीकडून-कर्नल-दळवी-संचालिका-सौ.-माधुरी-सहस्रबुद्धे-व-बालचमू-पाणी-बचतीची-शपथ-घेताना

डावीकडून-कर्नल-दळवी-संचालिका-सौ.-माधुरी-सहस्रबुद्धे-व-बालचमू-पाणी-बचतीची-शपथ-घेताना

 

शपथ पत्राचा फोटो

शपथ पत्राचा फोटो