‘सृजन’ आर्ट गॅलरीला बालरंजन च्या मुलांची भेट!

दिनांक: ८ जून, २०१७ 

बालरंजन केंद्राच्या उन्हाळ्याच्या सुटीतील भरगच्च उपक्रमांची सांगता,’चिंटू’कार श्री.चारुहास पंडित यांच्या सृजन आर्ट गालरीच्या भेटीने झाली. तेथील काष्ठ शिल्पात साकारलेल्या हत्ती,घोडा, उंट तसेच विविध देवता, शहरांचे महत्व दर्शविणाऱ्या विविध कलाकृती पाहून मुले मोहित झाली.

“लाकडाचे एकूण १३० प्रकार आहेत. त्यातील २० प्रकारचे लाकूड वापरून या आर्ट gallery मध्ये चित्रे बनविली जातात. त्यांच्या फ्रेम्सही इथेच केल्या जातात.” असे श्री.चारुहास पंडित यांनी मुलांना सांगितले.

काष्ठशिल्प बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी सोप्या भाषेत विषद केली. चित्र काढणे, त्यावर लेझर प्रक्रिया करणे, चित्रातल्या विविध भागांसाठी विविध प्रकारचे लाकूड निवडणे, ते कापणे व चिकटविणे यातून 3D परिणाम दाखविणाऱ्या चित्राची निर्मिती होते असे ते म्हणाले.

चारुहास काकांना मुलांनी यावेळी चिंटूचे चित्र काढून दाखविण्याचा आग्रह केला आणि तो हट्ट काकांनी पूर्णही केला.

यावेळी सौ.भाग्यश्री पंडित व श्री.नातू यांनीही मुलांना उपयुक्त माहिती सांगितली.

बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

एक ‘आगळेवेगळे’ कलादालन पाहून मुले अनुभवसमृद्ध झाली आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाली.

'सृजन' आर्ट गॅलरीला बालरंजन च्या मुलांची भेट!

‘सृजन’ आर्ट गॅलरीला बालरंजन च्या मुलांची भेट!