स्वा.सावरकर स्मारकाला भेट

दिनांक: २६ एप्रिल, २०१७ 

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रातील मुलांनी खास सुट्टीनिमित्त कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकाला भेट दिली.

यावेळी, मुलांनी स्वा.सावरकरांचा पुतळा, विदेशी कापडाच्या होळीचे शिल्प, तसेच सभागृहातील स्वा.सावरकरांची तैलचित्रे बघितली. सभागृहाबाहेरील म्यूरल, दगडी भिंत, नक्षीदार जाळी आणि पेटत्या माशालीही मुलांनी बारकाईने पहिल्या. प्रा.शाम भुर्के यांनी मुलांना स्वा.सावरकरांच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या. “आचार्य अत्रे स्वा.सावरकरांबद्दल बोलताना असे म्हणाले होते की साहित्यात नवरस आहेत, पण त्यात दहावा रस आणायचा असेल तर तो आहे ‘देशभक्ती’. आणि त्याचे जनक आहेत स्वा.विनायक दामोदर सावरकर!” असे श्री.भुर्के यांनी नमूद केले.

“क्रांतिकारकांचे शिरोमणी स्वा.सावरकर यांचे स्मारक हे आपल्या भागातील ‘वारसा स्थळ’ आहे आणि ते आपण आदराने जपले पाहिजे. दोन जन्मठेपांची शिक्षा व अतोनात शारीरिक छळ सोसलेले ते एकमेव क्रांतिकारक आहेत. दुर्दम्य आशावादाची प्रेरणा आपण स्वा.सावरकरांकडून घेतली पाहिजे” असे बालरंजनच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.

त्यानंतर, विदेशी कापडाच्या होळीच्या प्रसंगावरील एक फिल्म मुलांना दाखवण्यात आली. पालकवर्गही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

स्वा.सावरकर स्मारकाला भेट

स्वा.सावरकर स्मारकाला भेट

स्वा.सावरकर स्मारकाला भेट

स्वा.सावरकर स्मारकाला भेट