नाट्यशिबिराचा समारोप

दिनांक: २० मे, २०१७ 

बालरंजन केंद्राच्या नाट्यशिबिराचा समारोप पुणे आकाशवाणी वरील निर्मात्या ज्योत्स्ना केतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

बालरंजनच्या नाट्यवर्गाचे हे २७वे वर्ष आहे. यावेळी, ‘ऐकली कीर्ती, केली कृती’ हे बालनाट्य मुलांनी सादर केले. मैत्रेयी, इशिता, गार्गी आणि रीधिमा यांनी आत्मविश्वासपूर्वक धमाल नाट्यछटा सादर केल्या. त्यापैकी ‘वा रे पाणी टंचाई’ व ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या पाणीविषयक नाट्यछटांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

ज्योत्स्ना केतकर यांनी मुले व पालकांशी संवाद साधला. भाषणाऐवजी त्यांनी मुलांना एक छानशी गोष्ट सांगितली. “कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती वाया जात नाही. आत्ताच्या फायदा तोट्याचा विचार न करता, पालकांनी मुलांना शिबिराला घालावे. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो.” असे त्या म्हणाल्या.

संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले,”या नाट्य शिबीर तसेच जुलै मध्ये चालू होणाऱ्या साप्ताहिक, सहामाही नाट्यवर्गातून अनेक मुलांमधल्या नाट्यविषयक सुप्तगुणांना आजवर वाव मिळालेला आहे. गेल्या २६ वर्षांत बालरंजन केंद्राने शंभरहून अधिक बालनाट्यांची निर्मिती केली आहे. तसेच अनेक वैय्यक्तिक व सांघिक पारितोषिके प्राप्त केली आहेत. परंतु, त्यासाठी वाजवी दरात उपलब्ध होणारे बालनाट्यगृह पुणे शहरात नसल्याने ही नाटके शहरातील मुलांना पाहायला मिळत नाहीत.” अशी खंत सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केली.

नाट्य शिबिराला श्री.देवेंद्र भिडे व सौ.रेणुका भिडे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रज्ञा गोवईकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सीमा अंबिके यांनी आभार मानले. 

नाट्यशिबिराचा समारोप

नाट्यशिबिराचा समारोप

नाट्यशिबिराचा समारोप

नाट्यशिबिराचा समारोप

नाट्यशिबिराचा समारोप

नाट्यशिबिराचा समारोप