पथनाट्य व खेळ

दिनांक: ८ मे, २०१७ 

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात एक ‘हटके’ कार्यक्रम झाला . वस्ती विभागातील मुलांनी बालरंजन केंद्रात येऊन तेथील मुलांसमोर दोन छानशी पथनाट्ये सादर केली .अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे श्री .श्रीनिवास इंदापूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम सादर केला. संस्थेची एकूण ३२ मुले व ९ शिक्षक आले होते . महात्मा गांधी वस्तीतील मुलामुलींनी ‘ सारे शिकूया , पुढे जाऊया ‘ हे पथनाट्य सादर केले तर पाटील इस्टेट वस्तीतील मुलांनी ‘ स्वच्च शहर , सुंदर शहर ‘ या विषयावर पथनाट्य सादर केले. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण ,पाण्याचा अपव्यय टाळा ,आपला परिसर स्वच्च ठेवा यासारखे संदेश त्यांनी पथनाट्यातून दिले .बालरंजन केंद्रातील खुल्या रंगमंचावर रंगलेल्या या सादरीकरणास उपस्थित मुले व पालकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली . त्यानंतर सर्व मुलांचे एकत्रित खेळ घेण्यात आले.तसेच ह्या पाहुण्या मुलांना खाऊ देण्यात आला.

बालरंजनच्या संचालिका माधुरीताई यांनी वस्ती विभागातील मुलांच्या आत्मविश्वासपूर्ण वावराचे कौतुक केले.’ आहे रे’ व ‘ नाही रे ‘ गटातील मुले एकत्र येतील असे कार्यक्रम वाढविले पाहिजेत त्यामुळे ही दरी मिटण्यास मदत होईल ‘ असे मत माधुरी ताईंनी व्यक्त केले . श्री. इंदापूरकर यांनी  मुलांना दिलेल्या या संधीबद्दल संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांचे आभार मानले .सीमा अंबिके यांनी सूत्रसंचालन केले.  

पथनाट्य व खेळ

पथनाट्य व खेळ

पथनाट्य व खेळ