दिनांक: २१ एप्रिल, २०१७
दरवर्षी एप्रिल महिन्यातला बालरंजन केंद्रातील मुलांचा लाडका कार्यक्रम म्हणजे कथाकथन आणि रसपान. यंदा श्रीमती नीलिमा रास्ते यांनी मुलांना आपल्या गोष्टींनी गुंगवून टाकले. माकडाची गोष्ट, कान लांब झालेल्या राजाची गोष्ट, छोट्या गटाने ऐकली तर साने गुरुजींच्या दोन गोष्टी मोठ्या गटाला भावल्या. लाकडी चरकावर, आपल्या देखत काढलेल्या उसाच्या रसाचा मुलांनी आस्वाद घेतला. ‘ आपण कचरा निर्माण करावयचा नाही ‘ असा वसा घेतलेल्या मुलांनी घरून आणलेल्या स्टीलच्या ग्लास मध्ये रसपान केले. मुलांच्या या पर्यावरणस्नेही वर्तनाचे संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी कौतुक केले. दीप्ती कौलगुड यांनी आभार मानले.