चला करूया बीज गोळे!

दिनांक: ४ जुलै, २०१७ 

बालरंजन केंद्रात ‘भवताल’ संस्थेच्या सहकार्याने बीज गोळे बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला . मातीत खेळायला मिळणार म्हणून मुले फारच खूष होती . सर्वप्रथम मुलांनी मातीतले खडे वेचून बाजूला काढले . त्यानंतर शेणखत व माती,थोडेसे पाणी घालून मुलांनी मनसोक्त मळली.त्याचे छोटे छोटे गोळे केले. प्रत्येक गोळ्यात एक बी मधोमध ठेवली. नंतर तो लाडू काव किंवा हळदीच्या पाण्यात बुडविला व वळायला ठेवून दिला .रंग दिल्याने त्यात कोणते बी आहे ते ओळखणे सोपे जात होते. भवताल च्या अमर,इरावती व वनिता या दादा-ताईंनी मुलांना मार्गदर्शन केले. 

बालरंजन केंद्राच्या संचालिका व नगरसेविका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले ,’आम्ही मुलांचे सहा गट केले . तांबडा भोपळा, फणस , पपई ,चिंच , सिताफळ व मोसंबी असे हे गट होते . त्या-त्या गटाला त्याच बिया दिल्या होत्या. मुलांनी अत्यंत उत्साहाने बीज गोळे बनविले.एका तासात १००० बीज गोळे तयार झाले . अशाप्रकारे हा पर्यावरण विषयक उपक्रम यशस्वी झाला .”

श्री. अभिजित घोरपडे यांनी मुले व पालकांशी संवाद साधला.” यात कोणत्याही वयाच्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात .आपल्या हाताने काम केले की एक नाते निर्माण होते .निसर्गात जाऊन अनुभव घ्या, तोच खरा अभ्यास ! आपल्या मित्रमैत्रिणींना हे बीज गोळे वाढदिवसाला भेट द्या .यातून खूप झाडे आपण निर्माण करू शकतो . झाडे आपल्याला प्राणवायू देतात त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावा आणि जगवा ” असा संदेश श्री. घोरपडे यांनी दिला. सीमा अंबिके, दाऊद सुतार व आशिष रबडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

चला करूया बीज गोळे !

चला करूया बीज गोळे !

 

चला करूया बीज गोळे !

चला करूया बीज गोळे !