हा खेळ बाहुल्यांचा

दिनांक: १८ जुलै, २०१७ 

बालरंजन केंद्राच्या ३० व्या वर्षाच्या निमित्ताने काही खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे . त्यातील एक कार्यक्रम होता ‘हा खेळ बाहुल्यांचा’. चैताली माजगावकर-भंडारी यांनी हा पपेट शो सादर केला. “आपल्या कलेद्वारे बाहुलीला जिवंत करणे म्हणजे पपेट शो” असे चैताली यावेळी म्हणाल्या. सुरुवातीलाच शेरखानने प्रेक्षकातून प्रवेश केला त्यामुळे मुले खुश झाली. टम्पू माकड आणि मॉन्टी हा बोलका बाहुला मुलांना आवडला . ‘जंगल जंगल बात चली है’ व ‘हम है हिंदुस्तानी’ या गाण्यांवर मुलांनी ताल धरला. गोष्टी व गाण्यांनी कार्यक्रम खुलत गेला. यावेळी श्री. माजगावकर यांनी कोंबडा, कुत्रा, मांजर, पोपट, कावळा, कोकिळा, गाय, गाढव यासह टांगा, आगगाडी यांचे आवाज काढून मुलांचे रंजन केले.बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. यावेळी सुषमा दातार, दर्शन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

हा खेळ बाहुल्यांचा

हा खेळ बाहुल्यांचा

हा खेळ बाहुल्यांचा

हा खेळ बाहुल्यांचा