दिनांक: १ जानेवारी, २०१७
एकविसाव्या शतकातल्या मुलांना सतत नाविन्याची ओढ असते. त्यांची ही मानसिकता लक्षात घेऊन नगरसेविका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी कमला नेहरू पार्कमध्ये मुलांसाठी कुंड्यांच्या बाहुल्या बनविल्या आहेत.
मुलांना घेऊन बागेत येणाऱ्या पालकांसाठी हा एक ‘फोटो स्पॉट’ बनला आहे. एकात-एक ओवलेल्या विविध आकाराच्या व अनेक रंगांच्या कुंड्यांपासून हे ‘बाहुली-शिल्प’ तयार केले आहे.
ह्या शिल्पातील गोंडस मुले-मुली आपले जणू मित्र-मैत्रिणी आहेत असे समजून मुले या परिसरात रमून जातात. नववर्षाच्या सुरुवातीला बालचमुंसाठी ही एक भेट ठरली आहे.