शारीरिक विकासाचे महत्व!

दिनांक: १४ मार्च, २०१७

बालरंजन केंद्राने तिसाव्या वर्षाची थीम ‘फिटनेस’ ही घेतली आहे.

त्यातील पहिला कार्यक्रम ‘मुलांच्या शारीरिक विकासाचे महत्व’ व साधनांसह प्रात्याक्षिके असा होता. सौ.माया आघारकर यांनी केंद्राच्या सुजाण पालक मंडळात हे पुष्प गुंफले. वाढत्या शहरीकरणामुळे मुलांना मुक्तपणे खेळायला मैदाने उपलब्ध होत नाहीत. त्यावर उपाय म्हणून मायाताईनी ‘indoor playground’ ची संकल्पना पालकांसमोर मांडली. मुलांमधली उर्जा विधायक मार्गाने खर्च व्हावी व त्यांची तंदुरुस्ती वाढावी यासाठी हा प्रयत्न होता.

माया आघारकर यांनी bouncy ball, scoot boards, jumping feet, tossball game, scarves, bean bag and soft potatoes हे साहित्य वापरून विविध खेळ पालकांसमोर सादर केले. त्यातून साध्य होणारी कौशल्ये – rolling, jumping, skipping, hanging, climbing, vaulting & balancing यांच्याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

“गेल्या दहा वर्षात मला प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे – मुलांची ढासळत जाणारी तंदुरुस्ती ! त्यामुळे, मुलांच्या शारीरिक विकासासाठी विशेष प्रयत्न करून त्यांना सुदृढ बनवणे गरजेचे आहे. आयुष्यात आपल्याला जे काही साध्य करायचे असेल त्याचे आपल्यापाशी असलेले एकमेव साधन म्हणजे आपले शरीर. म्हणून, बालरंजन केंद्रात आम्ही तिसाव्या वर्षाची थीम ‘फिटनेस’ हीच घेतली आहे. येत्या उन्हाळी सुट्टीतली शिबिरेही याच विषयावर असतील” असे केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यावेळी म्हणाल्या.

सौ.माधवी केसकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती डॉ.श्यामला वनारसे, सुषमा दातार, नेहा जोशी व अपूर्वा बहुलीकर यांची होती.

सौ.माया आघारकर प्रात्यक्षिक दाखवताना

सौ.माया आघारकर प्रात्यक्षिक दाखवताना