बालरंजन केंद्रात विज्ञानदिन साजरा

दिनांक: २८ फेब्रुवारी, २०१७

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात विज्ञानदिना निमित्त मुलांना छोटे छोटे वैज्ञानिक प्रयोग करून दाखविण्यात आले. ज्वलनासाठी असेलेली प्राणवायूची गरज, पाण्यात तरंगणार्या आणि बुडणाऱ्या अंड्याचा प्रयोग, स्ट्रॉमधून येणाऱ्या हवेमुळे नाचणारा चेंडू, लिटमस पेपर चा बदलणारा रंग तसेच कागदाच्या दोन कप व दोरी यांच्या सहायाने केलेला फोन अशी हि रंजकदार प्रात्याक्षिके होती. मुलांना त्या जादू मागचे विज्ञान बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.

” मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन लहानपणापासून निर्माण होणे गरजेचे असते. त्यामुळे मुले अंधश्रद्धेला बळी पडत नाहित. यंदा बालरंजन केंद्राचे ३० वे वर्ष आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.” असे सौ. सहस्रबुद्धे या वेळी म्हणाल्या.

बालरंजन केंद्रात विज्ञानदिन साजरा

बालरंजन केंद्रात विज्ञानदिन साजरा