संगीत, योग आणि आरोग्य

दिनांक: २५ एप्रिल, २०१७ 

बालरंजन केंद्राच्य सुजाण पालक मंडळात सौ. साधना लेले यांचे संगीत, योग व आरोग्य या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,’समाजात वावरताना माणूस अनेक मुखवटे घेऊन वावरत असतो. मात्र प्रत्यक्षात, अस्तित्व आणि व्यक्तिमत्व यातील अंतर कमी करायला हवे.’

यानंतर, साधनाताईनी योगातील ‘अन्नमय कोष’, ‘प्राणमय कोष’, ‘मनोमय कोष’, ‘विज्ञानमय कोष’ व ‘आनंदमय कोष’ या संकल्पना स्पष्ट केल्या. संगीताचा मनावर आणि शरीरावर परिणाम होत असतो. संथ सांगीत ऐकले तर श्वासाची गती कमी होते. मुलांना अभ्यासाच्या आधी राग ऐकवले तर त्याचा निश्चित चांगला परिणाम होतो.

पालकांना मुलांच्या आहाराबद्दल सांगताना,”जया गोष्टींची जाहिरात केली जाते, त्या गोष्टींची शरीराला बिलकुल गरज नसते हे लक्षात ठेवावे” असा मंत्र त्यांनी दिला.  

‘बालरंजन केंद्राची ३० व्या वर्षाची थीम – ‘फिटनेस’ हि आहे. त्यामुळे दर महिन्यात मुलांच्या व पालकांच्या तंदुरुस्ती विषयक कार्यक्रम घेतले जातील’ असे बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

या वेळी सौ.लेले यांच्या सहकार्यांनी योगासनांची आकर्षक प्रात्याक्षिके सादर केली. त्याला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली.

अशा होनवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर दीप्ती कौलगुड यांनी आभार मानले.

संगीत, योग आणि आरोग्य

संगीत, योग आणि आरोग्य

 

संगीत, योग आणि आरोग्य

संगीत, योग आणि आरोग्य