हनुमान जयंती निमित्त टेकडी चढणे स्पर्धा

दिनांक: ८ एप्रिल, २०१७ 

गेली १५ वर्षे  लॉ कॉलेज च्या मागील टेकडीवर हनुमान जयंती निमित्त टेकडी चढणे स्पर्धा घेण्यात येते. 3 ते 80 वर्षे वयोगटातील स्पर्धक यामध्ये भाग घेतात. आज या स्पर्धांचा बक्षीस समारंभ नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता टेकडीवर आल्हाददायक वातावरणात पार पडला. या वेळी प्रथम हनुमान जन्माचा पाळणा सौ. कुदळे यांनी म्हटला . त्यानंतर आरती झाली.  

एकवेळा , 3 वेळा व ५ वेळा टेकडी चढण्याच्या स्पर्धा विविध वयोगटांसाठी घेण्यात आल्या होत्या. विजेत्या स्पर्धकांमध्ये वडील – मुलगा, आई – मुलगी, आजोबा – नातू व पती – पत्नी अशा जोड्याही सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना सौ. सहस्रबुद्धे म्हणाल्या,” सर्व व्यायाम प्रेमी  आणि निसर्ग प्रेमी नागरिकांचं मी अभिनंदन करते. शारिरीक संपत्ती हि ज्याची त्यानी मिळवायची, वाढवायची, साठवायची आणि मग भोगायची किंवा उपभोगायची असते. हुनुमान हे बालोपासनेचे प्रतिक असून आज या निमित्ताने आपण तंदुरुस्तीची प्रेरणा घ्यावी. स्पर्धेत सहभागी चिमुकल्यांचे विशेष कौतुक वाटते तसेच ‘५ वेळा टेकडी चढणे स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते ‘ ७९ वर्षांचे परांजपे काका व ६९ वर्षांच्या निरुपमाताई भावे यांचे मी विशेष अभिनंदन करते.” या वेळी नगरसेवक जयंत भावे व  असंख्य नागरिक उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे नेटके आयोजन श्री. पिसोळकर, डॉ. विजय फडके, श्री. रमेश सहस्रबुद्धे , श्री. मारुती कुदळे, सौ. पद्मिनी पानसे व सौ. रश्मी मुळ्ये यांनी केले होते.       

टेकडी-चढणे-स्पर्धेचा-बक्षीस-समारंभ-हस्ते-सौ.-माधुरी-सहस्रबुद्धेसौ.-माधुरी-सहस्रबुद्धे

टेकडी चढणे स्पर्धेचा बक्षीस समारंभ – हस्ते सौ. माधुरी सहस्रबुद्धेसौ. माधुरी सहस्रबुद्धे

टेकडी-चढणे-स्पर्धेच्या-विजेत्या-अश्विनी-सोवनी

टेकडी-चढणे-स्पर्धेच्या-विजेत्या-अश्विनी-सोवनी

५ वेळा टेकडी चढणे स्पर्धेच्या विजेत्या निरुपमा भावे

 

 

 

 

 

 

 

 

५ वेळा टेकडी चढणे स्पर्धेच्या विजेत्या निरुपमा भावे 

५ वेळा टेकडी चढणे स्पर्धेच्या विजेत्या डॉ. लिली जोशी

५ वेळा टेकडी चढणे स्पर्धेच्या विजेत्या डॉ. लिली जोशी