ऋतुचक्र

दिनांक: २८ ऑगस्ट, २०१७ 

बालरंजन केंद्रातील मुलांनी ‘ ऋतू ‘ ह्या संकल्पनेवर सुंदर कार्यक्रम सादर केला. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या गणेशोत्सवातील विविधगुणदर्शन कार्यक्रमांचे हे ३० वे वर्ष होते . ह्यावेळी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी मुलांशी साध्या सोप्या भाषेत संवाद साधला. मुलांकडून दोन कविता त्यांनी म्हणून घेतल्या आणि स्वतःचे ‘स्वराली’चे पालकत्व निभावतानाचे अनुभव सांगून उपस्थित पालकांशी जवळीक साधली . 

बालरंजनच्या कलाकारांनी गणपती बाप्पाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली . त्यानंतर 

‘आली सुट्टी,आली सुट्टी’, सर्दी गर्मी और बरसात,पावसात खिडकी लावते आई ही गाणी सादर केली. नाट्यवर्गातील मुलांनी ‘ ऋतुचक्र ‘ हे नाटक तसेच नाट्य अभिवाचन सादर केले. अतिशय मेहनत घेऊन बसविलेल्या या कार्यक्रमाचे साऱ्यांनी कौतुक केले. 

नगसेविका आणि बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यावेळी म्हणाल्या ,” आत्ता आम्ही तीन ऋतू सादर केले. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. पण बालरंजन केंद्रात एक ऋतू बाराही महिने असतो , तो म्हणजे ‘जिव्हाळा’ ! ह्या मुलांप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळेच आम्ही तीस वर्षे बालविकासाचे काम करीत आहोत.” असे सांगून त्यांनी ‘ टीम बालरंजन ‘ चे कौतुक केले . 

ऋतू थीम ला साजेशी सजावट रंगमंचावरील पडद्यावर केली होती. त्यासाठी तनया सोवनी, सई पुरंदरे व दाऊद सुतार या ताईदादांनी मेहनत घेतली.

यावेळी उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . बालरंजनचा पहिला माजी विद्यार्थी नगरसेवक झाल्याबद्दल श्री.आदित्य माळवे याचा माधुरीताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक श्री.सिद्धार्थ शिरोळे व बालरंजनचे पालक-आजोबा श्री. अजित आपटे तसेच भारती निवास सोसायटीच्या गणेशोत्सव प्रमुख सौ. शैला पाध्ये उपस्थित होत्या.  

ऋतुचक्र

ऋतुचक्र

ऋतुचक्र

ऋतुचक्र

ऋतुचक्र

ऋतुचक्र