तंदुरुस्तीसाठी विविध खेळ

दिनांक: १२ मे, २०१७ 

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात विविध खेळ शिकविण्यासाठी श्री. हेमंत टाकळकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री. टाकळकर हे ‘ फिजिकल फिटनेस ‘तज्ञ असून ते स्वतः खोखोपटू आहेत. अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार व वीर अभिमन्यू पुरस्कार ह्या चारही पुरस्कारांनी सन्मानित झालेले श्री.टाकळकर हे भारतातील एकमेव खेळाडू आहेत.

‘बालरंजन केंद्राच्या ३०व्या वर्षाची थीम ‘फिटनेस’ ही असल्यामुळे टाकळकर सरांना मुद्दाम आमंत्रित केले आहे” असे केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.

सौ.सीमा अंबिके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि त्यानंतर सरांनी मैदानाचा ताबा घेतला व सर्व मुलांना खेळते ठवले.

रिंग व बॉल यांच्या सहाय्याने मुलांचा स्टॅमिना वाढविण्यासाठी विविध खेळ त्यांनी घेतले. पायांमधली शक्ती वाढविणारे व चपळता आणणारे तसेच स्ट्रेचिंगवर भर देणारे खेळ सरांनी मुलांकडून करून घेतले. खेळता खेळता बुद्धीला चालना देणारे वेगळे खेळ त्यांनी मुलांना शिकविले.

3 वर्षांपासून १६ वर्षापर्यंतच्या मुलांना एकच खेळ घेता येतो, मात्र त्याची काठीण्य पातळी बदलत न्यावी लागते, याचे प्रत्याक्षिकही त्यांनी दाखविले. “कुठलाही खेळ तुम्ही खेळणार असाल तरी त्यातली मुलभूत गोष्ट ‘fitness’ ही आहे. त्यानंतर त्या खेळातले कौशल्य आणि स्पर्धेच्या वेळी त्याचा केला जाणारा उपयोग ह्या गोष्टी येतात. सध्या सुरु असलेल्या उन्हाळी सुट्टीचा उपयोग मुलांनी आपला फिटनेस वाढवण्यासाठी करावा” असे श्री.हेमंत टाकळकर यांनी बालरंजन केंद्रातील मुलांना व त्यांच्या पालकांना सांगितले.

तंदुरुस्तीसाठी विविध खेळ

तंदुरुस्तीसाठी विविध खेळ

तंदुरुस्तीसाठी विविध खेळ