कडू सरांचा सत्कार

दिनांक: १२ सप्टेंबर, २०१७

सुप्रसिद्ध चित्रकार व साहित्यिक श्री.ल.म.कडू सरांचा आज बालरंजन केंद्रात,संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कडू सरांच्या ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकास दिल्लीच्या साहित्य अकादमीचा मानाचा ‘ बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.’ या पुस्तकात सरांनी मुलगा व खार यांच्या माध्यमातून मानव व निसर्गाच्या मैत्रीचे चित्र रेखाटले आहे.सर हे निसर्गाशी एकरूप झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या चित्रांनी आणि लेखनाने मुलांना खूप आनंद दिला आहे.’ असे माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.

 कडू सरांनी मुलांना विविध माध्यमातून चित्रे काढून दाखवली.थोडे रंग, भेंडी व ब्रश वापरून नाचणारी मुलगी , फुललेला गुलमोहर अशी चित्रे झटपट तयार झाली.चारकोल वापरून स्वतःचे सुंदर स्केच काढले .

 यानंतर सरांनी त्यांच्या ‘विद्याविहार ‘ या शेतीतल्या प्रयोगाबद्दल सविस्तर माहिती मुले व त्यांच्या पालकांना सांगितली.मुलांनी प्रश्न विचारून शंकांचे निराकरण करून घेतले . दीपाली बोरा यांनी आभार मानले. 

कडू सरांचा सत्कार

कडू सरांचा सत्कार

कडू सरांचा सत्कार

कडू सर

कडू सरांचा सत्कार