इकोफ्रेंडली रक्षाबंधन!

दिनांक: ६ ऑगस्ट, २०१७ 

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रातील मुलांनी यंदा ‘पर्यावरणस्नेही राखीपौर्णिमा’ साजरी केली. यावेळी, मैदानावरील दोन मोठ्या वृक्षांना मुलांनी राख्या बांधल्या व वृक्षांशी नाते जोडले.

“प्लास्टिक किंवा थर्मोकोल याचा वापर न करता, या भल्यामोठ्या राख्या जुने पुठ्ठे, रंगीत कागद व कापड अशा गोष्टींचा पुनर्वापर करून बनविल्या होत्या.” असे केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. मुलांना पर्यावरण रक्षणाचे महत्व लहानपणापासूनच पटवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमासाठी बालरंजन केंद्राचे कार्यकर्ते तनया सोवनी व दाउद सुतार यांचे सहकार्य लाभले.

इकोफ्रेंडली रक्षाबंधन!