फटाकेमुक्त दिवाळीची शपथ !

दिनांक: ११ ऑक्टोबर, २०१७

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात दिवाळी पार्टीच्या वेळी संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी मुलांना ” फटाकेमुक्त दिवाळीची” शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात दिवाळीच्या गाण्यांनी झाली. ” पणत्या लावू एक, दोन ; अंधाराला भितय कोण ? “, ‘ आली दीपावली ‘,झगमग दिवाळी ” आदी विविध गाणी तायांनी मुलांकडून म्हणून घेतली. त्यात माधुरीताईंसह लता दामले, आशा होनवाड, मंजिरी पेठे , किशोरी कुलकर्णी व सीमा अंबिके सहभागी झाल्या. त्यामुळे दिवाळीचा माहोल तयार झाला. रांगोळ्या, पणत्या आणि आकाशदिव्यांनी हॉल सुशोभित झाला होता.त्यानंतर पंगतीत बसून मुलांनी लाडू, चकली, चिरोट्याचा आस्वाद घेतला.

 ” दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश ! या दिवाळीत आम्ही फटाके वाजवून हवेचे व ध्वनिचे प्रदूषण करणार नाही.आम्ही भारताचे भावी नागरिक अशी शपथ घेतो की हि दिवाळी तसेच वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी आम्ही कटिबध्द राहू ” अशी प्रतिज्ञा यावेळी मुलांनी घेतली. 

फटाकेमुक्त दिवाळीची शपथ !

फटाकेमुक्त दिवाळीची शपथ !

फटाकेमुक्त दिवाळीची शपथ !

फटाकेमुक्त दिवाळीची शपथ !