निर्विषीकरण (Detoxification)

दिनांक: ११ जुलै, २०१७ 

कोणत्याही आजारावर आहारातून प्रभावी उपचार करता येतात, मात्र त्यासाठी स्वनियंत्रण व शिस्त आवश्यक आहे.” असे मत आहारतद्न्य डॉ. विभूषा जांभेकर यांनी व्यक्त केले. बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात त्या बोलत होत्या. शरीराच्या गरजा पूर्ण होणे म्हणजेच पोषण. पण बदललेली जीवनशैली, वेगवेगळी औषधे घेणे, हवा, पाणी आणि अन्नाचे प्रदूषण, मानसिक ताणताणाव यामुळे शरीरात विषद्रव्ये तयार होतात. म्हणून निर्विषीकरणाची गरज भासते .

त्यासाठी ताजे अन्नपदार्थ खावेत. आंबवलेले पदार्थ, मोड आलेली कडधान्ये, सालीसकट धान्ये आवर्जून खावीत. उग्र वासाच्या भाज्या उदा. कोबी, नवलकोल , मुळा ,कांदा , लसूण , शेपू आपल्या आहारात असाव्यात. बदाम, अक्रोड, तीळ व जवस यातून ओमेगा ३ आपल्याला मिळतात. मोड आलेल्या मेथ्या व क जीवनसत्वामुळे निर्विषीकरण सुलभ होते.

प्लास्टिक च्या पिशवीतले दूध किंवा अन्नपदार्थ मायक्रोवेव्ह मध्य गरम करू नये, मैदा वर्ज्य करावा, अशा टिप्स विभूषा जांभेकर यांनी पालकांना दिल्या. श्रावण महिन्यात पचनशक्ती मंदावते. प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे हा कालखंड निर्विषीकरणासाठी उपयुक्त ठरतो. 

“बालरंजन केंद्राची ३० व्या वर्षाची थीम ‘फिटनेस’ ही आहे. तंदुरुस्तीचा आणि आहाराचा अतिशय घनिष्ट संबंध आहे . हेच या व्याख्यानाचे प्रयोजन आहे” असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले. वर्षा बरिदे यांनी आभार मानले.

डॉ. विभूषा जांभेकर व सौ. माधुरी सहस्रबुद्धे

डॉ. विभूषा जांभेकर व सौ. माधुरी सहस्रबुद्धे

 

डॉ. विभूषा जांभेकर

डॉ. विभूषा जांभेकर