खूsssप गंमत करू !

दिनांक: १४ नोव्हेंबर, २०१७

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात आज बालदिन साजरा करण्यात आला.श्री. धनंजय सरदेशपांडे यांनी बालगोपाळांचे रंजन केले.

“नाचू , खेळू गप्पा मारू, खूप गम्मत करू ,

गाणी गोष्टी नाटुकल्यानी,रंग मजेचे भरू”

या संकल्पना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अचानक प्रमुख पाहुण्यांनी प्रेक्षकातून एन्ट्री घेऊन एक छोटे नाटुकले सादर केले.

त्यानंतर बर्याच आक्श्न असलेल्या गाण्यांनी मुलांना मोहिनी घातली.या गाण्यात विमान, हत्ती , उंट , डायनासोर , कुत्रा असे अनेक प्राणी मुलांना भेटले.श्री.धनंजय सरदेशपांडे यांनी मुलांना साहित्यिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेली ” कोल्ह्याची गोष्ट” सांगितली. कविवर्य विंदा करंदीकरांच्या पिशिमावशीची कविता मुलांना आवडली. आधुनिक ससा कासवाच्या गोष्टीतून ट्राफिकचे नियम पाळण्याचा संदेश मिळाला. 

   ” बालदिन हा मुलांचा हक्काचा दिवस असतो. या दिवशी त्यांचे निखळ मनोरंजन होणे गरजेचे असते, म्हणून ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. यावेळी सभागृहात फुगे, माळांनी सुशोभन केले होते. खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आशा होनवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

खूsssप गंमत करू !

खूsssप गंमत करू !

 

खूsssप गंमत करू !

खूsssप गंमत करू !

 

खूsssप गंमत करू !

खूsssप गंमत करू !